नालेसफाई झाली का हातसफाई झाली?-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबईमध्ये कालच्या एका दिवसात पावसाने हाहाकार माजवला. कालच्या एका दिवसात मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यातल्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मुंबईतल्या पावसाच्या या परिस्थितीचा आढावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेवर निशाणा साधला.
मुंबईमध्ये ११३ टक्के नालेसफाई झाली का हातसफाई झाली? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. तसंच ज्या गतीने पम्पिंग स्टेशनची उभारणी करायला हवी तशी होत नाही, त्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये पाणी साचलं. गेल्या १५ वर्षांमध्ये महापालिकेने या कामांकडे दुर्लक्ष केल्याचा, हा परिणाम असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
www.konkantoday.com