पुढील २४ तासात मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस कोकणात पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ४ आणि ५ ऑगस्ट दरम्यान मुंबई, ठाणे उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ही स्थिती ६ ऑगस्टपर्यंत कायम राहणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
www.konkantoday.com