महसूल दिन सोहळा साधेपणात साजरा,उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

0
33

: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महसूल दिन साध्या पध्दतीने अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी येथे साजरा करण्यात आला. यावेळी सन 2019- 2020 या महसूली वर्षामध्ये आपली जबाबदारी व कर्तव्ये उत्कृष्टपणे पार पाडून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उत्कष्ट कामाचे सत्कार संबधित उपविभागीय स्तरावर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील,उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांतधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी, प्रांतधिकारी चिपळूण प्रवीण पवार, उपजिल्हाधिकारी राजश्री मोरे, उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर आदि मान्यंवर उपस्थित होते.
ते म्हणाले महसूल विभाग हा शासनाचा कणा असून महसूल विभाग हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणार खाते आहे. सर्व लोकांच्या जीवनाला स्पर्श करणार खात आहे. कोणत्याही विभागाची कोणतीही योजना राबविण्यात महसूल विभागाची सहकार्य असते. कोरोना आजाराच्या अनुषंगाने विभाग चांगल काम करत असून निसर्ग चक्रीवादळामध्ये दापोली, मंडणगड तालुक्यातील महसूल यंत्रणेकडून केलेल्या कामाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. आपण चांगल काम करत आहात, अजून चांगल काम करुन सर्वसामान्य जनतेमध्ये महसूल विभागाबद्दलचा विश्वास वाढवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अधिकारी /कर्मचारी यांचा सत्कार
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कार झालेल्याची नावे अशी. दत्ता भडकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी, प्रविण पवार, उपविभागीय अधिकारी चिपळूण,शशिकांत जाधव, तहसिलदार,रत्नागिरी. एस.व्ही. फडके, निवडणूक नायब तहसिलदार, दत्तात्रय बेर्डे,नायब तहसिलदार.
अव्वल कारकून सवंर्गातील अमर घोसाळकर, एस.एस. फाटक, एस.जी. धातकर, किर्ती दामल, सुरेंद्र भोजे, जी.एस.राऊळ, बालाजी फोले, शिल्पा शेटये, स्वरदा आंबवकर, सुचिता पावसकर . तसेच लिपीक टंकलेखक संवर्गातील श्रृती आलीम, रोशन कांबळे, अतुल बेंडखळे, श्रेया दाभोळकर, के.पी. गायकवाड, पुनाजी बागूल, दिपाली झोरे, रुपाली जाधव, के.यु. ढेपे, महादेव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
शिपाई संवर्गातील वैशाली साळवी, सुर्यकांत साळवी, अभिजीत चव्हाण, आर.आर. चव्हाण, दिनेश शिंगमे, गुरुदास भिमसी पवार, बी.ए.माने तसेच वाहनचालक संवर्गातील सुनिल गार्डी, अमोल किर यांचा सत्कार करण्यात आला
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here