दापोली येथील अडखळ मोहल्ला येथे आरोग्यसेविकेला सर्व्हे करण्यास रोखले, ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

0
41

दापोली प्राथमिक आरोग्य केंद्र आसुद आंबवली येथील ग्रामसेविका शोभा विष्णू घावट या आजाराचे सर्व्हेक्षण करण्यासाठी दापोली येथील अडखळ मोहल्ला येथे कर्तव्य बजावण्यास गेल्या असता त्या ठिकाणी एकत्र जमाव जमला त्यांनी आरोग्य सेविका घावट यांची मोटरसायकल अडवून तुम्ही आमच्या गावात सर्व्हे करायचा नाही, गावात कोणीही पेशंट नाही, आम्ही तपासणी होवू देणार नाही, तुम्हाला कोणी पाठवले त्या सुपरवायझरचे नाव सांगा असे सांगून तुमची व्हिडिओ काढतो अशी धमकी देवून त्यांना शासकीय काम करण्यास रोखले. याबाबत तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार अर्ज केल्यानंतर अडखळ मोहल्ल्यातील ११ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here