आपटा रेल्वे स्थानक हे चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वात लोकप्रिय स्थानक

0
52

चित्रपटांमध्ये अनेकदा रेल्वे स्थानक दाखवलं जातं. आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला सिनेमाच्या शुटिंगसाठी पसंती दिली जात होती. पण त्यानंतर आता मध्य रेल्वेवरील आपटा रेल्वे स्थानक हे चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वात लोकप्रिय स्थानक ठरत आहे. २०१९-२०२० या आर्थिक वर्षात आपटा रेल्वे स्थानकावर रात अकेली है, मुंबई सागा आणि शुभ मंगल झायदा सावधान यासह चार चित्रपटांचं शुटिंग झालं. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ८ चित्रपटांचे शुटींग झाले होते. त्यामध्ये लोकप्रिय चित्रपट पंगा, चोक्ड आणि सूरज से मंगल भारी या चित्रपटांचा समावेश आहे.
याआधी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, रंग दे बसंती, बागी, खाकी, शादी नंबर १, चाइनाटाऊनसह अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये आपटा स्टेशन कॅमेर्‍याबद्ध झालं आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here