चाकरमान्यांच्या तपासणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व प्रवेशद्वारांवर 1 ऑगस्टपासून महसूल, पोलिस आणि आरोग्य विभाग यांची संयुक्त पथके
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे नागरिक तसेच चाकरमान्यांच्या तपासणीसाठी जिल्ह्याच्या सर्व प्रवेशद्वारांवर 1 ऑगस्टपासून महसूल, पोलिस आणि आरोग्य विभाग यांची संयुक्त पथके ठेवण्यात येणार आहेत. ज्या व्यक्ती संशयित आढळतील अशांची कोरोना रॅपिड टेस्ट केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात येणार्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधला.जिल्हाधिकारी म्हणाल्या, कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सव कालावधीसाठी अद्यापपर्यंत शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत जी नियमावली आहे त्यानुसारच जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे. नव्याने सूचना आल्यास त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. नियमांची अंमलबजावणी करताना चाकरमानी आणि स्थानिक ग्राम नियंत्रण समित्यांमध्ये वाद होणार नाहीत, याचीही दक्षता घेतली जाणार आहे
www.konkantoday.com