सिंधुदुर्ग येथील सत्यवान रामचंद्र ऊर्फ भाई कदम यांनी ४२व्या वर्षी इयत्ता १० वीची परीक्षा देऊन यश मिळवले
शिक्षणासाठी वय पाहिले जात नसते. शिकण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची असते. हेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागात परिचर म्हणून कार्यरत असलेल्या सत्यवान रामचंद्र ऊर्फ भाई कदम यांनी ४२व्या वर्षी इयत्ता १० वीची रिपीटर परीक्षा देऊन त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन सिद्ध केले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागात भाई कदम हे कंत्राटी परिचर म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत गरीब परिस्थिती असणारे भाई कदम यांना १९९६ मध्ये दहावी नापास झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देता आली नव्हते परंतु त्यांनी चिकाटी सोडली नाही
www.konkantoday.com