वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकार

0
40

वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकार दर्शविला आहे. त्यामुळे येत्या ३१ जुलैला न्यायालयात राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडू, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख केले आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे राज्यातील अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याला नकार देण्यात आल्याचे ते म्हणाले.
कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच घेण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने इंटर्नशिप सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, मात्र यास केंद्रीय परिषदेने नकार दिल्याने येत्या ३१ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार आपली बाजू भक्कमपणे मांडेल ,असा विश्वास मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here