राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये सर्व सवर्गाच्या पदांची भरती करा.मग आंतरजिल्हा बदल्या कराः समविचारीची मागणी
रत्नागिरीः (प्रतिनिधी)
राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये विविध शाखाअंतर्गत शेकडो पदे अनेक वर्षे न भरल्याने रिक्त आहेत.ग्रामीण भागातील नागरिकांचे हे सचिवालय अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मेटाकुटीला आले आहे.
मुळात रिक्तपदे न भरता शासनाला आंतरजिल्हा भरतीचा सोस सुटल्याने काही जिल्हापरिषदांची स्थिती अवघड होणार आहे.ही बाब गंभीर आहे.म्हणून राज्य भरातील जिल्हा परिषदांमधील रिक्त जागा त्वरित भरा.मगच आंतरजिल्हा बदल्या करा अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात शासनाच्या पोर्टलवरुन रितसर निवेदन देण्यात आल्याचे समविचारी मंचच्या वतीने कळविण्यात आले आहे.
www.konkantoday.com