दारू पिऊन तरुण लांजा बसस्थानकांच्या आवारात मोबाईल टॉवरवर चढला, पोलिसांनी ताब्यात घेतले

शोलेतल्या जयची आठवण करून देणारा हा प्रकार सोमवारी सायंकाळी लांजा बसस्थानकाजवळ घडला. दारू पिऊन तर्रर्र असलेला तरुण लांजा बसस्थानकांच्या आवारात असलेल्या मोबाईल टॉवरवर सोमवारी सायंकाळी चढला. त्याचे लडखडणे पाहून बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकला
हा टॉवरला जवळपास तीनशे फूट उंच आहे. सोमवारी संध्याकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास विजय पांडुरंग नेमण ( ४५ ) हा याने टॉवरवर चढायला सुरुवात केली. बसस्थानकाच्या आजूबाजूला असलेले रिक्षाचालक तसेच लोकांनी यांनी त्याला पाहिले टॉवरवर न चढण्याचा सल्ला दिला.मात्र तो कुणाचेही न ऐकता विजय लोखंडी शिडीवर चढत होता. खाली मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती प्रत्येकजण त्याला खाली उतर असे विनंती करत होते. मात्र तो ऐकतच नव्हता मी दहीहंडीचा सराव करतो आहे, असे बोलत होता.
तो जवळपास दिडशे फुट वरती चढला तेव्हा पोलिसांना कळवण्यात आलेपोलिसांना पाहिल्यानंतर तो खाली उतरला ताबडतोब पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button