
एसटी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना घेऊन जाणार?
कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी महामंडळाची सेवा बंद ठेवण्यात आली होता. दोन ते अडीत महिने सेवा बंद असताना केवळ महामुंबईत अत्यावश्यक सेवांसाठी एसटी सेवा सुरु होती. मात्र, अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर जिल्ह्यांतर्गत बससेवा मर्यादित स्वरुपात सुरु करण्यात आली होती. त्यासाठी निवडक कर्मचाऱ्यांनाच कर्तव्यावर बोलावले जात होते.
आगामी गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सोमवारपासून कामावर हजर राहण्याचा आदेश दिला आहे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना घेऊन जाण्यासाठी आता बसच्या सर्व सेवा चालवणे भाग पडणार आहे, त्यासाठीच हा निर्णय झाल्याचे समजते
www.konkantoday.com