संगमेश्वर देवडे येथे एकाची आत्महत्या
संगमेश्वर तालुक्यातील देवडे कदमवाडीत राहणारे आत्माराम पांडुरंग कदम (६५) यांनी गळफास लाऊन आत्महत्या केली. आत्माराम यांची पत्नी चार महिन्यांपूर्वी मृत्यू पावली होती. त्यानंतर त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. सतत ते मानसिक तणावाखाली असत. यातूनच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली.
www.konkantoday.com