रत्नागिरी जिल्ह्यात डाक कार्यालयात आता ऑनलाईन व्यवहार
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ६५० टपाल कार्यालयात इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेची (IPPB) सुविधा सुरू आहे. या सर्व कार्यालयामध्ये सर्व प्रशिक्षित पोस्टमन व ग्रामीण डाकसेवकांना स्मार्ट फोन पुरवण्यात आलेले आहेत. या स्मार्ट फोनद्वारे सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील खातेधारक पोस्ट कार्यालयातून AePS (Adhar enbled Payment System) च्या माध्यमातून पैसे काढू शकतील.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व गावांगावात पोस्ट कार्यालयाची आयपीपीबीची शाखा कार्यरत असून ग्रामीण भागातील जनतेला पैसे काढण्यासाठी कोणत्याही बँकेत किंवा एटीएमला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात किंवा आपल्या भागात टपाल बटवडा करण्यासाठी येणार्या टपाल वितरक (पोस्टमन) शी संपर्क करून आधार क्रमांकाच्या आधारे आपले पैसे अगदी सहजरितीने व अत्यंत कमी वेळेत काढता येतील.
AePS द्वारे एकावेळी एक व्यक्ती दहा हजार रुपये काढू शकतो.AePS चे व्यवहार करत असताना संबंधित व्यक्तीचे बँक अकाऊंटशी संलग्न असलेले आधार कार्ड व फोन सोबत असणे आवश्यक आहे.
आजवर चालू आर्थिक वर्षात रत्नागिरी शाखेतून २१३५७ व्यवहार झाले असून ६.४१ कोटी इतकी रक्कम AePS द्वारे काढण्यात आली आहे.
AePS सुविधेचा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन एम. नरसिम्हा स्वामी, अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.
www.konkantoday.com