
मनसेच्या वतीने दापोलीत रक्तदान शिबीर संपन्न
दापोली:- (वार्ताहर)महाराष्ट्र नवनिर्माण सेना दापोलीच्या वतीने पेन्शनर्स हॉल सभागृह दापोली येथे आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले.
या शिबीराचे उद्घाटन खेडचे नगराध्यक्ष श्री.वैभव खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रक्तदान शिबीरात ५० दात्यांनी रक्तदान केले. यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष श्री.सचिन गायकवाड, तालुकाध्यक्ष श्री. नितीन साठे, श्री.अरविंद पुसाळकर, श्री.साईराज अरविंद पुसाळकर देसाई सुजित गायकवाड तसेच मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com