
चिपळूण येथे मंगळसूत्र चोरी प्रकरणी दुकान मालकाविरूद्ध तक्रार
चिपळूण येथील पुजा गारमेट दुकानात फिर्यादी सोनाली सदानंद टाकळे या खरेदीसाठी गेल्या असता त्यांच्या पर्समधील मंगळसूत्र चोरीला गेले. याबाबत त्यांनी दुकान मालका विरोधात तक्रार दाखल केली आहे.
यातील सोनाली टाकळे या गारमेंट दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपली पर्स काऊंटरवर ठेवली होती व ट्रायल घेण्यासाठी त्या ड्रेसिंग रूममध्ये गेल्या होत्या. बाहेर आल्यावर त्यांचे मंगळसूत्र आढळून आले नाही. हे मंगळसूत्र दुकान मालकानी घेतले असावे या संशयावरून त्यांनी पुजा गारमेटचे मालका विरोधात चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजेहा प्रकार एप्रिल महिन्यात घडला होता. त्यानंतर त्यांनी जूनमध्ये पोलीस अधिक्षकांकडे अर्ज केला होता. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com