पिझ्झा खाण्याचा मोह पडला महाग, तेवीस हजाराचा ऑनलाईन फटका
चिपळूण येथील सोफीन शेख याना पिझ्झाची ऑनलाईन ऑर्डर देण्याच्या प्रयत्नात २३ हजार ८३७ रुपयांचा ऑनलाईन फटका बसण्याची घटना घडली आहे.
चिपळूण शहरातील काविळतळी भागात राहणारे सोफीन शेख (वय १६) यानी पिझ्झाची ऑर्डर देण्यासाठी मोबाईवर गुगल डॉमिनोज नंबर निअर असे सर्च केल्यावर त्याना एक नंबर आला. त्यानंतर फिर्यादीने मोबाईलवर त्यान नंबरला फोन केल्यावर समोरून राहुल नाव सांगणार्या व्यक्तीने पिझ्झाचे पेमेंट गुगल पेद्वारे करण्यास सांगितले. यासाठी त्यानी राहुल व राजकुमार असे नाव टाईप करायला लावून रक्कमेच्या ठिकाणी कोड टाईप करायला सांगितले व पुढे प्रोसिड पे करायला सांगितले. त्यामुळे फिर्यादीच्या अकाऊंमधून २३ हजार ८२७ रुपये काढून घेवून त्याची ऑनलाईन फसवणूक केली.
www.konkantoday.com