गणेशोत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची आ. शेखर निकम यांची मागणी
चिपळूण तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे झालेल्या आढावा बैठकीत आ. शेखर निकम यांनी काही उपयायोजना आखण्याबाबत सुचविले आहेत. सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याबाबत सकारात्मक विचार करू असे सांगितले आहे.
तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल व खाजगी डॉक्टरांचा या सेवेत समावेश करावा, गणेशोत्सव काळात येणार्या चाकरमान्यांची वाढती संख्या पाहता तालुक्यात स्वॅब तपासणी केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी व स्वॅब टेस्टींग लवकरात लवकर करावी अशी मागणी आ. निकम यांनी केली आहे.
www.konkantoday.com