
मालवण सर्जेकोट खाडीत मच्छिमारीसाठी गेलेल्या दोन छाेट्या नौका बुडाला, दहा खलाशांनी किनारा गाठला, एक खलाशी बेपत्ता
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण सर्जेकोट खाडीत मच्छिमारीसाठी गेलेल्या यशवंत देऊलकर यांची बोट घेवून चार खलाशी मच्छिमारीसाठी गेले असता पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर बोट खेचली जावून पलटी झाली व बोटीवरील चारहीजण समुद्रात फेकले गेले. मच्छिमारांनी आरडाओरड केल्यावर त्यांना वाचविण्यासाठी राजेश देऊलकर यांची छोटी मच्छिमारी बोट घेवून काही मच्छिमार मदतीसाठी धावले परंतु पाण्याच्या प्रवाहाबरोबर तीही बोट बुडाली. दोन्ही बोटींवरील खलाशांनी पोहत किनारा गाठला. मात्र यातील दोन जणांची तब्येत गंभीर झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर एक मच्छिमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली.
www.konkantoday.com