कामथे घाटात रसायनयुक्त टँकर रीकामा करण्याचा घाट ग्रामस्थांनी रोखला, आरोपीवर गुन्हा दाखल
काही दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यातील फुरुस बांदकोट नदीत रसायनयुक्त पदार्थ सोडल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे घाटात पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा प्रयत्न झाला. हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना पाचारण केले. रात्री उशीरापर्यंत तपास सुरू होता. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील त्याची माहिती देण्यात आली.
गुरूवारी सायंकाळी एका टँकरमधून रसायनयुक्त राखेसारखा पदार्थ महामार्गालगत टाकताना ग्रामस्थांना निदर्शनास आला. त्यावर आक्षेप घेत संबंधितांना रोखण्यात आले. याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी संजय यशवंत लटके याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदरच्या आरोपीने गाडीत असलेल्या राखेसारखा पदार्थ सार्वजनिक ठिकाणी पाण्यात सोडून ते पाणी दुषित करून ते पाणी पिण्यास अयोग्य केले, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com