शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आय.ए.एस अकॅडमीतर्फे एक हजार विद्यार्थ्यांना यू.पी.एस.सी-(आय.ए.एस) परीक्षेचे मोफत प्रशिक्षण
मुंबई प्रभादेवी येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आय.ए.एस अकॅडमी तर्फे महाराष्ट्रातील 1 हजार विद्यार्थ्यांना यू.पी.एस.सी (आय ए एस)परीक्षेचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी 22 जुलै 2020* नोंदणीची अंतिम तारीख असून त्याचा यू.पी.एस.सी (आय ए एस) परीक्षेला बसू इच्छीत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीलाभ घ्यावा असे आवाहन राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजनजी साळवीह्यांनी केले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (नागरी सेवा) आय.ए.एस/आय.एफ.एस/आय.पी.एस/आय.आर.एस या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा यशस्वी टक्का वाढावा यासाठी 2001 झाली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे* यांच्या मार्गदर्शनाखाली शिव विद्या प्रबोधिनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आय.ए.एस अकॅडमी* ची स्थापना करण्यात आली.
अकॅडमीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या निवड प्रक्रियेद्वारे* पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील 1 हजार* विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश* प्रक्रिया पूर्ण करावी विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीचे मोफत प्रशिक्षणराज्यातील 36 जिल्ह्यात ऑनलाईनदेण्यात येणार आहे यु.पी.एस.सी* बाबत जागृती वाढवण्यासाठी इयत्ता 11 वी पासूनच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षेला* बसावे असे आवाहन शिवसेना उपनेते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आय.ए.एस अकॅडमीचे संस्थापक संचालक श्री विजय कदम यांनी केली असून रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी कोणते प्रकारचे मदत लागल्यास आमदार डॉ.राजन साळवी संपर्क कार्यालय शिवसेना जिल्हा कार्यालय आठवडा बाजार, रत्नागिरी दूरध्वनी (02354) 220425* या वर संपर्क साधावा किंवा श्री. शुभम राजन साळवी (7507252925)* व श्री.कृष्णा वसंत पेडणेकर (9423290096)* यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांनी केले आहे.
www.konkantoday.com