बारावी विज्ञान शाखेच्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांची डुप्लिकेट पुस्तकेही आली

0
42

बारावी विज्ञान शाखेच्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांची पुस्तके आता बाजारात मिळू लागली आहेत. मात्र काही डुप्लिकेट पुस्तके आली असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ही डुप्लिकेट पुस्तके छापणाऱ्या व विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील पुस्तक दुकानात शैक्षणिक वर्ष 2020-21 ची सुरुवात झाल्यापासून इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या फिजिक्स,च केमिस्ट्री व बायोलॉजी इत्यादी विषयांच्या डुप्लिकेट पुस्तकांची सर्रास विक्री सुरू चालू असल्याचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या निदर्शनास आले आहे. अशा पुस्तकांची आपल्या जिल्ह्यासह महाराष्ट्रात विक्री होत असण्याची शक्यता असल्यानेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here