गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणातील चाकरमान्यांसाठी सोडाव्यात, मुंबईस्थित चाकरमान्यांची मागणी

0
328

कोकणात गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा सण आहे. गणेश उत्सव हे दोन शब्द ऐकून कोकणी माणसाच्या चेहर्‍यावर आनंद, उत्साह भरभरून वाहायला लागते. हा सण कोकणात घरोघरी साजरा केला जातो. लाखो गणेशभक्त सणानिमित्त महाराष्ट्राच्या विविध कानाकोपर्‍यातून आपापल्या गावी कोकणात येतात. त्यात  मुंबई पुणे शहरातून गावाकडे परतणार्‍या चाकरमान्यांची सांख्या लक्षणीय आहे. कोरोना महामारीचा प्रभाव आणि सरकारने सुरु केलेली अनलॉक प्रक्रिया लक्षात घेता माझी सामान्य चकारमानांच्यावतीने अशी विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर रेल्वेची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. लॉकडाउन काळात बंद झालेली १२० दिवसांची आरक्षण व्यवस्था ३१ मेपासून सुरू करण्यात आली होती. तरी आंतरजिल्हा प्रवास बांदीचे कारण देत पुढील चार महिन्यानंतरचेही आरक्षण महाराष्ट्रातील प्रवाशांना उपलब्ध होत नसल्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणाि जाणार्‍याांचा भ्रमतनरास झाला असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सामान्य माणसाने मुंबई सावंतवाडी असा प्रवास ४ प्रवाशी क्षमता असलेल्या खाजगी गाडीने करायचा विचार केला तर २०,००० ते २५,००० दर आकाराला जातोय. त्यात ४ जणाांमध्ये जरी हे भाडे विभाजित केले तरी प्रति व्यक्ती ५,५०० आणि परतीच्या प्रवासाचे मिळून प्रत्येकी ढोबळ ११,००० रुपये खर्च होऊ शकतो. आणि हे दर सर्वसामान्य गरीब चाकरमान्यांना मुळीच परवडणारे नाहीत. आणि त्यामुळेच फक्त ज्यांची ऐपत आहे त्यांनीच प्रवास करावा असे राज्य सरकारला सुचवायचे आहे का असा प्रश्‍न आज सर्वसामान्य चाकरमान्यांनमध्ये उपस्थित झालाय. कारण जून पासून ज्या स्पेशल ट्रेन रेल्वेमार्फत सोडल्या गेल्या त्यात नेत्रावती एक्सप्रेस व मंगला एक्सप्रेस या दोन ट्रेन सध्या स्पेशल ट्रेन म्हणून कोकणातून जातात. आणि यांचे शयनकक्षाचे भाडे मुंबई ते कुडाळ, कणकवली फक्त ३५० रुपये एवढे आहे पण राज्य सरकारने रेल्वेला महाराष्ट्रातील स्थानकांचे तिकीट देवू नये असे सुचविले आहे त्यामूळे रेल्वेने या स्थानकाचे आरक्षण देणे बंद केले आहे.
यावेळी कोकणात रेल्वे न थांबल्यास लोंकाचा उद्रेक होऊ शकतो हे राज्य सरकारने ध्यानी घेवून पुढील निर्णय विचारपूर्वक घ्यावेत ही माझी सामान्य गणेश भाविकांच्या आणि कोकणातील चाकरमान्यांच्या वतीने विनंती आहे.
ज्या प्रकारे सरकारने बाहेरील राज्यातील विस्थापितांना त्यांच्या मूळगावी सुखरूप पोहोचवले त्याचप्रकारे सर्व सुरक्षेच्या बाबींची पडताळणी करून गणपती विशेष रेल्वे सेवा सुरू करावी. या गाड्या मुंबई सीएसएमटी, ठाणे, घाटकोपर, भांडूप, बांद्रा, बोरीवली, दिवा तसेच पनवेल ह्या स्थानकातून सोडण्यात याव्यात. मुंबईमधील छोटे कोकण म्हणून प्रसिद्ध असलेल्या भांडूपमध्ये कोकणी माणसांची संख्या ही लक्षणीय आहे. आणि एकांदर महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या सर्वसामान्यांसाठी १२ ऑगस्ट पर्यंतच्या लोकल रेल्वे सेवा शिथिलीकरणामुळे गंथव्य स्थानकापर्यंत पोहोचण्यास होणारी गैरसोय लक्षात घेता सरकारने भांडूप रेल्वे स्थानकावरून गणपती विशेष भांडूप सावंतवाडी रेल्वे चालविण्यात यावी. त्याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध करून आगाऊ प्रवाशांची संख्या आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनाने एकूण किती रेल्वे चालवाव्या लागतील ह्याची संबधितांना माहिती पुरवावी. अनेक वर्षापासूनची भांडूपकरांची गणपती विशेष भांडूप सावंतवाडी ही रेल्वे सेवा सुरु करण्यात यावी ही प्रलंबित मागणी ह्या निमित्ताने का होईना हीच ती वेळ सुरू करण्याची असे समजून जनसामान्यांची सुरु करण्यात यावी असे याठिकाणी सर्वांना वाटत आहे. आपण कोकणातील लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घ्यावी असे या ठिकाणी आम्हाला वाटत आहे.
अपेक्षा आहे की ह्या बाबतीत सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल.


– जयेश वालावलकर.
संपर्क : +९१ ९०८२६ २७४४८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here