खासदार संजय राऊत यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत ही तर ‘मॅच फिक्सिंग’- देवेंद्र फडणवीस
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत ही तर ‘मॅच फिक्सिंग’ असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुलाखत संपली की मग मी प्रतिक्रिया देईन असंही फडणवीस म्हणाले आहेत. कोणीही सरकार पाडत नाही आहे, असं सांगणं म्हणजे कांगावा आहे. यामुळे कोरोनाच्या लढाई दूर करण्याचा प्रयत्न असल्याचा सणसणीत टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विरोधी पक्षामधील नेते हेल्थ आणि डिझास्टर टुरिझमसाठी फिरत आहेत, असा सणसणीत टोला शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस आणि प्रवीन दरेकर यांना लगावला होता या.टीकेला फडणवीस यांनी खास शैलीत उत्तर दिले आहे.
नया है वहं, म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवता येतं. पण मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना? ते (आदित्य ठाकरे) नवीन आहेत. माझ्यासारख्या माणसानं त्यावर फार काही प्रतिक्रियाही देऊ नये.
www.konkantoday.com