क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याच्या बहाण्याने चिपळुणातील डॉक्टरची ऑनलाइन पस्तीस हजार रुपयांची फसवणूक
तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक करायचे आहे त्या बहाण्याने चिपळुणातील डाॅ.राहुल साळुंके यांची अज्ञात इसमाने पस्तीस हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे या प्रकरणी साळुंके यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे
फिर्यादी साळुंके यांचे चिपळुणातील एक्सेस बँकेत खाते असून चार दिवसांपूर्वी त्यांना आवश्यकता नसताना देखील बँकेने क्रेडिट कार्ड दिले होते फिर्यादी साळुंके यांना क्रेडिट कार्डची आवश्यकता नसल्याने त्यानी कस्टमर फोन केअरला करून हे क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याविषयी सूचना दिली होती त्यानंतर साळुंखे यांना अज्ञात इसमाने फोन करून आपण दिल्ली येथून एक्सेस बँकेच्या शाखे मधून बोलत असून तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यासाठी संपर्क केला होता त्याप्रमाणे तुमचे कार्ड ब्लॉक करीत आहे असे सांगितले प्रत्यक्षात संबंधित इसमाने क्रेडिट कार्डमधून ३५हजार ७९९काढून घेऊन फिर्यादीची फसवणूक केली
www.konkantoday.com