
ऑनलाइन कपडे मागविणार्याला चोवीस हजार रुपयांच्या गंडा
व्हॉट्सअॅपवर विविध कपडय़ांचे फोटो पाठवून त्या कपड्यासाठीचोवीस हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून प्रत्यक्षात कपडे न पाठवता फसवणूक केल्याचा प्रकार खेड येथे घडला आहे याबाबत खेड समर्थनगर येथील राहणारे समाधान सरवदे यांनी खेड पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे
यातील सरवदे यांच्या फोनवर अज्ञात इसमाने फोन करून आपण इरीना कंपनीतून बोलत असून आपली कंपनी कपड्यांचे उत्पादन करित आहे असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर कपड्याचे नमुने फिर्यादीच्या व्हॉट्सअॅपवर पाठविले फिर्यादी यांना त्यातील कपडे पसंत पडल्याने त्यांनी त्यापोटी आरोपींच्या खात्यात चोवीस हजार रुपये ट्रान्सफर केले परंतु प्रत्यक्षात आरोपीने कोणतेही कपडे पाठवले नाहीत व फिर्यादी यांची फसवणूक केली
www.konkantoday.com