मिरजोळे गावातील शीळ धरणाकडे जाणार्या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत चौकशी व्हावी, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे जिल्हाधिकार्यांना पत्र
भाजपचे नगरसेवक सुशांत उर्फ मुन्ना चवंडे यांनी मिरजोळे गावातील शीळ धरणाकडे जाणार्या रस्त्याच्या कामाबाबत नगरपरिषदेला निवेदन दिले होते. याबाबत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना पत्र पाठविले असून शीळ धरणातून रत्नागिरी नगरपरिषद हद्दीत नळपाणी योजनेचे पाईप मिरजोळे गावातून टाकण्यात आले आहेत. सदरचे काम घाईघाईत पूर्ण करण्यात आले. त्यामुळे रस्ता पाईप गेलेल्या भागातून खचला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था वाईट होणार असून अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या गैरसोयीबरोबर शासनाच्या निधीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर कंत्राटदारावर कारवाई करून त्याचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी केली आहे.
konkantoday.com