कशेडी घाटात कंटेनरची टँकरला जोरदार धडक, टँकरचालक जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील आणि खेड तालुक्यातील कशेडी घाटातील अतितीव्र स्वरूपाच्या उतारावर कंटेनर चालकाचा आपल्या ताब्यातील कंटेनरचा ताबा सुटल्याने मुंबईच्या दिशेने जाणार्या टँकरला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. टँकरचालक केबिनच्या आतमध्ये अडकला होता. वाहतूक पोलिसांनी चालकाला सुरक्षित बाहेर काढून नरेंद्र महाराज संस्थानच्या रूग्णवाहिकेने कळंबणीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची खबर मिळताच कशेडी वाहतूक पोलीस बोडकर हे आपल्या सहकार्यांना घेवून घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त टँकरचालक अरविंद गुप्ता (३०) असे यांचे नाव आहे.
www.konkantoday.com