सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल

0
284

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल होत असून, बाजारपेठा आणि दुकानेही पूर्वीप्रमाणे सुरू होत आहेत. जिल्ह्यातील हॉटेल्स व निवास व्यवस्था काही अटींवर सुरू होत आहेत. तर दुकानांची वेळ सकाळी ९ सायं. ७ वा. पर्यंत शासनाने वाढवली आहे. शासकीय कार्यालयांतील कर्मचारी, अधिकार्‍यांची आस्थापनाही पूर्वपदावर आणली जात आहे. गणेश चतुर्थी सणासाठी चाकरमानी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून नियोजन केले जात आहे. गणेशोत्सवाअगोदर क्‍वारंटाईनचे १४ दिवस जिल्हा प्रवेश बंदीचाही विचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here