पुष्कर पेट्रोकेमच्या मालकासह व्यवस्थापकाविरूद्ध गुन्हा दाखल

0
56

परराज्यातून कामगार आणणे खेड तालुक्यातील पेट्रोकेम कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. कंपनीच्या मालक व व्यवस्थाकांविरूद्ध खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटे ग्रामपंचायतीच्या ग्रामकृतीदलाचे सदस्य व उपसरपंच सचिन सुभाष चाळके (३४, रा. पिरलोटे) यांनी याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ३ जुलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पुष्कर पेट्रोकेमचे व्यवस्थापक प्रभाकर आंब्रे व मालक गौतम मखारिया यांनी पर राज्यातुन परप्रांतीय कामगारांना बसने कंपनीत कामाला आणले होते.
konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here