चिपळूण पाठोपाठ रत्नागिरीतही आरटीओ कडून वसुली

0
168

रत्नागिरी शहरात आज आरटीओने एका मोटरसायकलस्वाराकडून बाराशे रुपये दंड केल्याची घटना घडली आहे. याबाबत पत्रकारांनी आवाज उठवल्यावर आरटीओने दंड कमी करण्याचे आश्‍वासन दिले आहे. सदर व्यक्तीकडे गाडीची कागदपत्रे होती. त्याचे पीयुसी मे पर्यंत होते. त्यानंतर लॉकडाऊन असल्याने सध्या सर्व प्रक्रिया बंद आहेत. त्याने हेल्मेट घातले नव्हते व पीयुीसी नव्हते म्हणून आरटीओने दंड केला. याबाबत पत्रकारांच्या ग्रुपवर हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आरटीओनी दंड कमी करण्याचे आश्‍वासन दिले आहे. परंतु मुळात सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत अशी कारवाई का केली जाते याचा खुलासा होणे आवश्यक आहे. सामान्य माणूस पैशाच्या अडचणीत असल्याने आधीच पिचला आहे. त्यात खात्याच्या अशा वसुलीने तो आणखी हैराण होत आहे. खात्याना केसिसचे टारगेट आल्यावर ते वसुली करण्यासाठी अशा कारवाया करीत आहेत, अशी जनतेची भावना आहे. कागदपत्रांची मुदत संपली असल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले आहे. तरी देखील सामान्य लोकांना वेठीस धरले जात आहे. चिपळूणातही आरटीओच्या भरारी पथकाकडून मेमो फाडल्याबद्दल वाहनचालकांत नाराजी निर्माण झाली होती.
konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here