हाॅटेलना परवानगी पण राज्यातील ग्रंथालये अद्यापही बंद
राज्य शासनाने काही अटीवर हाॅटेलना परवानगी दिली मात्र गेले तीन महिने कोरोनामुळे राज्यातील ग्रंथालये बंद आहे. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाले मात्र अजून राज्य सरकारने ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी दिली नाही. मात्र ग्रंथालयांतील वाचकांकडून काही वेळासाठी ग्रंथालय उघडण्याची मागणी केली जाते. ग्रंथालय व्यवस्थापकांनी वाचकांसाठी योग्य त्या सुरक्षित उपायोजना करून ग्रंथालय खुली करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. मात्र ते राज्य सरकारच्या आदेशाच्या प्रतिक्षेत ग्रंथालये आहेत.
लॉकडाऊन ग्रंथालये बंद आहे. याचा फटका ग्रंथालयातील कर्माचाऱ्यांना बसत आहे.. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर जुलै महिन्यापासून ग्रंथालय सुरू करण्यास राज्य सरकार परवानगी देईल अशी अपेक्षा होती मात्र ३१ जुलै पर्यंत ग्रंथालय बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाला.
www.konkantoday.com