मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. संगमेश्वर परिसर वगळता अन्य ठिकाणी महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू होते. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून शासनाच्या निर्देशानुसार चौपदरीकरणाचे काम थांबविण्यात आले. शिथिलतेत चौपदरीकरणाच्या कामाला रितसर परवानगी देण्यात आली होती. परराज्यातील बहुतांशी मजूर, कामगार आपापल्या गावी गेल्याने शिथिलतेचे आदेश असूनही चौपदरीकरणाचे काम सुरू करणे ठेकेदार कंपनीला शक्य झाले नाही. नियमित पावसाला सुरूवात झाल्याने चौपदरीकरणाच्या कामाला दिवाळीनंतर मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.
konkantoday.com