रत्नागिरीच्या सुपुत्राचा समावेश असलेला पॅनल्टी चित्रपट नेटफ्लिक्सवर

0
106

कोकणातील नमनातून अभिनयाचे धडे घेतलेला रत्नागिरीतील उक्षी गावाचा सुपुत्र सुधीर घाणेकर याने पेनल्टी या हिंदी सिनेमाद्वारे बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळवला होता.फुटबॉल खेळावर आधारित हा चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित करण्यात आला होता.या चित्रपटातील कलाकारांची निवड ही
देशभरातून असंख्य फुटबॉलपटू आणि कलाकारांची ऑडिशन घेऊन करण्यात आली.चुझा हे नाव असलेल्या फुटबॉलपटूंच्या भूमिकेत सुधीर ने काम केले आहे.या चित्रपटात के.के मेनन,आकाश दाभाडे, शशांक अरोरा,लुकराम  स्मील, बिजु बंगजाम यांनी काम केले आहे.आता या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर ५ जुलैला जगप्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर झाला आहे.यामुळे आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर देखील रसिकांना पाहता येणार आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here