कोरोना योद्धे म्हणून पाठीवर कौतुकाची थाप मारणारे राज्य सरकार कर्मचार्यांसह वैद्यकीय अधिकार्यांना पोटावर मारणार आहे का?
राज्यात, जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचे जीव वाचविण्यासाठी धडपडत आहेत. कोरोना योद्धे म्हणून सरकार त्यांची पाठ थोपटत असले तरी याच कोरोना योद्ध्यांच्या पगारासाठी शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयातील शेकडो वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांची पगार बिले कोषागार कार्यालयात पडून आहेत. आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांसाठी पगार निधी न आल्याने एकाही वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचार्यांचा पगार झालेला नाही. त्यामुळे कोरोना योद्ध्ये म्हणून पाठीवर कौतुकाची थाप मारणारे राज्य सरकार कर्मचार्यांसह वैद्यकीय अधिकार्यांना पोटावर मारणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
konkantoday.com