भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातूंची कामथे उपजिल्हा रूग्णालयाला भेट

भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी बुधवारी कामथे उपजिल्हा रूग्णालयाला भेट दिली. यावेळी चिपळूण तालुका मुस्लिम समाजाच्यावतीने कामथे रूग्णालयात सुसज्ज केलेले तीन वॉर्ड त्याचबरोबर उपलब्ध करून दिलेले आयसीयुची पाहणी केली. डॉ. मारूती म्हात्रे यांनी या संदर्भातील माहिती दिली.
यावेळी भाजपा उपजिल्हाध्यक्ष रामदासजी राणे, चिपळूण तालुकाध्यक्ष विनोदभाई भोबस्कर, जिल्हा चिटणीस संतोष वरेकर, चिपळूण माजी शहराध्यक्ष महेश दीक्षित, ओबीसी तालुकाध्यक्ष संतोष मालप, मंदार कदम, डॉ. मारूती म्हात्रे आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. नातू यांनी चिपळूण तालुका मुस्लिम समाजाने आरोग्य सेवेसाठी योगदानाचे कौतुक केले.
konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button