शिवसैनिकांच्या श्रमदानातून नुकसानग्रस्त भागाची साफसफाई

0
209

दापोली :-(वार्ताहर)निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अनेक गावातील बागायती, व रस्त्यांवर ठिक ठिकाणी झाडे व मोठी वृक्ष कोलमडून पडली होती. त्यामुळे अनेक रस्ते व मार्ग देखील बंद झाले होते. या विस्कळीत अवस्थेला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन तुकड्या देखील शर्थीचे प्रयत्न करत आहेत
याच प्रयत्नांना अधिक बळ मिळावे यासाठी दापोली मतदारसंघाचे तरुण आमदार योगेशदादा कदम यांनी अनेक गावांतील शिवसैनिकांना श्रमदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत केळशी व आंजर्ले येथे उन्हवरे जि.प. गटातील शिवसैनिकांनी अथक मेहनत करत श्रमदान केले. कटरच्या साहाय्याने झाडे कापणे, परिसरात साफसफाई करणे व इतर कामे त्यांनी केली. त्यांच्या या मेहनतीमुळे अनेक ठिकाणी रस्ते मोकळे झाले आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here