कोकणातल्या माडी व्यावसाईकांना एक पैशाची मदत न करणार्या शासनाबाबत नाराजी,आत्महत्या करण्याची वेळ आणू नका
रत्नागिरी जिल्ह्यातील माडी व्यावसायिकांकडून दुकानाची परवाना फी शासनाने भरून घेतली असून आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा व्यवसाय शासनाने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता हा व्यवसाय नुकसानीत आला असून या व्यवसायावर अवलंबून असणार्या शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात माडी व्यवसाय गावागावात चालतो. घरात असलेल्या दहावीस माडांची माडी काढून त्याच्यावर अनेक कुटुंबे उदरनिर्वाह करतात. माडी विक्रिसाठी राज्य उत्पादन शुल्क दरवर्षी माडी दुकानाचा लिलाव होतो. २०१९ व २०२० सालासाठी शासनाकडून मार्च महिन्यापर्यंत पैसे भरून घेण्यात आले आहेत. तर त्यानंतर कोरोनामुळे १९ मार्चपासून ही दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. व्यावसायिकांनी कर्ज काढून केरळ व तामिळनाडू येथून मजुरांना माडी उत्पादन करण्यासाठी ठेवले आहे. त्यांचा पगार माडी व्यावसायिकांना द्यावा लागत आहे. याशिवाय विक्रीसाठी जागा भाड्याने घेतल्याने तेही द्यावे लागत आहे. आज बँकांचे कर्जांचे हप्ते , मुलांची शाळा सुरू होताच भरावी लागणारी फी , जिवनावश्यक रोज लागणार्या वस्तु ,लाइटबील , फोन बिल हा सर्व पैसा कुठुन आणायचा?असा सवाल या व्यवसाईकाना पडला आहे
शासनाने या सर्वांवर विचार करायला हवा मुठभर व्यावसाईक म्हणुनच चिरडून टाकू अस जर शासनाचे धोरण असेल तर ते स्पष्ट करा ?
कारण आम्हा व्यावसाईकांना खरच आज कोणी वाली नाही भविष्यात तर हा धंदा पुढे चालेल न चालेल पण आता कर्जाऊ पैसे काढुन ज्यांनी ज्यांनी दुकान घेतलीत त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये
ह्यावर शासनाने गंभिर विचार करा असे या व्यवसाईकाचे म्हणणे आहे
या सर्व माडी व्यावसायिकांच्या अडचणींचा विचार करून शासनाने व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी माडी विक्रेत्यांची मागणी आहे.
www.konkantoday.com