पावसाळी सहलीसाठी धरणावर जाण्यास अनिश्चित कालावधीसाठी बंदी
पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी धरणांवर सहलीला जाण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात सातत्याने वाढले आहे. यंदा धरणावरील पावसाळी सहलींवर जलसंपदा विभागाने बंदी घातली आहे. पर्यटक, नागरिकांनी धरणांवर पावसाळी सहलीसाठी जाऊ नये अशा आशयाचे सूचना फलक विविध ठिकाणी उभारण्यात आले आहेत.
www.konkantoday.com