पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार आहेत. दुपारी चार वाजता नरेंद्र मोदी बोलणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने यासंबंधी ट्विट केलं आहे. पण यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी कोणत्या विषयावर बोलणार आहेत यासंबंधी माहिती दिलेली नाही. केंद्र सरकारने चिनी अॅपवर बंदी घातल्याचा निर्णय़ जाहीर केल्यानंतर काही वेळातच पंतप्रधान कार्यालयाकडून हे ट्विट करण्यात आलं. त्यामुळे नरेंद्र मोदी भारताचे सार्वभौमत्व, संरक्षण, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयावर भाष्य करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
www.konkantoday.com