जिल्हा बंदतर्फे परस्पर घेतलेल्या निर्णयाला जिल्हा कॉंग्रेसचा विरोध

0
29

जिल्ह्यातील व्यापारी संघ अन्य इतर राजकीय पक्ष यांना विश्‍वासात घेऊन चर्चा न करता १ जुलै ते ८ जुलै या कालावधीत रत्नागिरीत जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय हा नागरिकांच्या जगण्यावरील घाला आहे. अशा कोणत्याही परस्पर घेतलेल्या निर्णयाला जिल्हा कॉंग्रेसचा विरोध आहे. एकीकडे सव्वा तीन महिन्यानंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हळुहळू राज्य अनलॉक करण्यासाठी भूमिका घेत असताना कोणा एका व्यक्तीला वाटले म्हणून अनपेक्षितपणे संपूर्ण जिल्हा पुन्हा लॉक करून गोरगरीब जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न म्हणजे हुकुमशाहीचे द्योतक असल्याचा आरोप जिल्हा कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या भेटीत केला.
कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. विजयराव भोसले, कॉंग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे, राजापूरचे नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here