कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाच आरोग्य यंत्रणेतील त्रूटी समोर येवू लागल्या
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाच आता शासकीय रूग्णालयात असलेल्या आरोग्य यंत्रणेवर आणखी मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून चुकीचे प्रकार होत असल्याच्या घटना घडत आहेत. जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या या पद्धतीने समन्वय पाहिजे तेवढा होत नसल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यात मुंबईहून आलेल्या एका कुटुंबातील अकरा वर्षीय मुलीसह सिव्हिलमध्ये स्वॅबसाठी नेण्यात आले. त्यांचेकडून फॉर्म घेतल्यानंतर त्यांना स्वॅब सेंटरच्या बाहेर स्वॅब घेण्यासाठी दोन तास ताठकळत रहावे लागले. मात्र स्वॅब घेण्याआधीच त्यांना मोबाईलवर स्वॅब घेतल्याचा मेसेज आला. त्यामुळे या कुटुंबियांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्याबाबत एका सामाजिक संस्थेचे पदाधिकारी तेथे उपस्थित होते. त्यांनी या प्रकाराबाबत संबंधितांना जाब विचारला परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. असेच प्रकार भविष्यात घडू नये अन्यथा लोकांच्यात नाराजी निर्माण होवू शकते.
www.konkantoday.com