राज्यात काल कोरोनाच्या ५४९३ नवीन रुग्णांचे निदान

0
32

राज्यात काल कोरोनाच्या ५४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. काल २३३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८६ हजार ५७५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.५९ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख २३ हजार ५०२ नमुन्यांपैकी १ लाख ६४ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१७.८२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार ४७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात काल १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here