जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह 580,ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह संख्या 119

रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 29–जिल्हयात काल सायंकाळपासून 20 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 580 आहे. कोव्हीड केअर सेंटर घरडा, लवेल येथून 03 तर समाजकल्याण, रत्नागिरी येथून 01 अशा जिल्हा रुग्णालय 01 आणि पेढांबे येथून 02 असे एकूण 07 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 437 झाली आहे. काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 20 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे

शिरगाव ता. रत्नागिरी-03

जेल रोड ता. रत्नागिरी-02

मालगुंड ता. रत्नागिरी -01

गावडे आंबेरे ता. रत्नागिरी-01

राजिवडा ता. रत्नागिरी-01

घरडा कॉलनी लवेल ता. खेड-06

कुंभारवाडा ता. खेड-01

पायरवाडी कापसाळ ता.चिपळूण-02

पेठमाप चिपळूण-01

गोवळकोट ता.चिपळूण-01

जुनी कोळकेवाडी ता.चिपळूण-01 सध्या रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 119 आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे. आज साळवी स्टॉप, रत्नागिरी, उद्मनगर,ता. रत्नागिरी, मारुतीमंदीर, रत्नागिरी, चर्मालय, ता. रत्नागिरी, भाटये,ता. रत्नागिरी, टिवंडेवाडी शिरगाव, ता. रत्नागिरी, बौध्दवाडी, मिरजोळे, ता.रत्नागिरी हे सात क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तसेच नर्सिंग हॉस्टेल, गोगटे कॉलेज ग्राऊंड शेजारी, झाडगाव नाका, मौजे साखरतर, मौजे मेर्वी, मौजे धामणसे, मौजे नरबे, मौजे लाजूळ, मौजे देवूड, मौजे उक्षी, मौजे नाणीज, मौजे भंडारपुळे,मौजे करबुडे कोंड, मौजे कशेळी, राजिवडा, मौजे नाचणे शांतीनगर, मौजे गणेशगुळे, ता.जि. रत्नागिरी या भागात कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या कन्टेनमेंट झोनचा कालावधी पूर्ण झाला यामुळे याच्या सिमा पूर्ववत करण्यात आल्या. *सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे*

एकूण पॉझिटिव्ह – 580

बरे झालेले – 437

मृत्यू – 25

ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 118 + 1

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या 45 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 17 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 01, दापोली मध्ये 7 गावांमध्ये, खेड मध्ये 5 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 8 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 21, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 3, कोव्हीड केअर सेंटर, पेंढाबे, चिपळूण – 2, उपजिल्हा रुग्णालय कळबणी – 1, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 5, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – 14 असे एकूण 47 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वॉरंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 20 हजार 189 इतकी आहे.
साडे आठ हजार निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 9 हजार 410 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 9 हजार 156 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 580 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 8 हजार 541 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 254 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 254 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 28 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 59 हजार 731 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 84 हजार 803 आहे.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती दि. 29 जून 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो. पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button