रत्नागिरी जिल्ह्यात ऑपरेशन ब्रेक द चेनला सुरुवात,१ जुलै ते ८ जुलै कडक लॉकडाऊन

0
345

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा १ ते ८ जुलै अशा कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतले असल्याची माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.सध्या कोरोनाचे अॅक्टिव्ह ११७ रुग्ण असून ती संख्या शुन्यावर आणण्यासाठी व कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यपातळीवर सर्व संबंधितांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.रत्नागिरी शहरासह दापोलीतील दोन गावात कोरोना रुग्णांनाची कोणतीही हिस्ट्री नसल्याने जिल्ह्यात कम्युनिटीस्प्रेड होण्याची शक्यता आहे त्याबाबत चौकशी सुरू आहे परंतु सावधानता म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.आठ दिवसांनंतर पुन्हा एकदा परिस्थिती पाहून लॉकडाऊन शिथील करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले.नागरिकांच्या आरोग्यासाठी हा नाईलाजाने निर्णय घेण्यात आला आहे या आधीही रत्नागिरीतील जनतेने प्रशासनाचे नियम पाळून चांगल्या प्रकारे सहकार्य केले होते.या लॉकडाऊनमध्ये देखील नियम पाळून जनता चांगल्या प्रकारे प्रतिसाद देईल असा मला आत्मविश्वास आहे असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.रत्नागिरी जिल्ह्यातील मृत्यूंची संख्या वाढत असल्याने आता टास्क फोर्सची पण स्थापना करण्यात येत असून मुंबई पुण्यात असलेले प्लाजमा थेरेपी आता रत्नागिरीतही सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.ऑपरेशन ब्रेक द चेन बाबत बोलताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले की नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.१ जुलै ते ८ जुलै असा कडक लॉकडाउन सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत राहणार आहे.यावेळेत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही आहे,जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात येणार असून जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे बंद राहणार आहेत.या काळात संपूर्ण दुकाने,चारचाकी वाहने दुचाकी वाहने ,रिक्षा आदींना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने,दवाखाने पशुवैद्यकीय दवाखाने व तर अत्यावश्यक गोष्टी सुरू राहतील.या काळात खासगी ऑफिसेस देखील पूर्णपणे बंद राहणार असून सरकारी कार्यालयात फक्त दहा टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.बँका व पोस्ट सेवा सुरू राहणार आहेत.तसेच कृषी संबंधीचे दुकाने सुरू राहणार आहेत.सध्या संध्याकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्णपणे कर्फ्यू राहणार असून फक्त वैद्यकीय कारणासाठी नागरिकांना बाहेर पडता येणार आहे.हा लॉकडाऊन मंगळवारी रात्री बारानंतर कींवा बुधवारी सकाळपासून सुरू करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here