दुर्लक्षित मच्छिमारांसाठी विशेष योजना राबविणार -आ.भास्करराव जाधव
सरकारकडून शेतकरी, बागायतदारांना कोणत्याही स्वरूपात मदत मिळत असते परंतु गुहागर तालुक्यातील माझ्या दुर्लक्षित मच्छिमार समाजाला आजपर्यंत कोणतीच मदत किंवा भरपाई मिळालेली नाही. त्यांना स्मार्ट कार्ड देण्यासाठी मी प्रयत्नशील आहेच. शिवाय त्यांच्यासाठी स्वतंत्र योजना आणली असून प्रथम आपल्या तालुक्यातील मच्छिमारांसाठी ही योजना प्रायोगिक तत्वावर राबवू, त्यानंतर जिल्ह्यातील मच्छिमारांपर्यंत ही योजना पोहोचवू, असे मत आ. भास्करराव जाधव यांनी व्यक्त केले.
www.konkantoday.com