रत्नागिरी जिल्ह्यात 420 रुग्ण बरे झाले,ॲक्टीव्ह रुग्ण 111
रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 27–जिल्हयात काल सायंकाळपासून 35 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 554 आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 12 समाजकल्याण, रत्नागिरी येथून 7 व आयटीआय संगमेश्वर येथून 1 रुग्ण अशा 20 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 420 झाली आहे.
काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 35 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे
रत्नागिरी तालुका
भाट्ये-01
चर्मालय-01
शिरगाव-02
मारुती मंदिर-01
खेडशी-02
समर्थ नगर-01
गावडे आंबेरे-02
मालगुंड-01
साठरेबांबर-01
नवेल-01
कुवेशी-01
राजीवडा-01
राजापूर तालुका
धाऊलवल्ली-01
लांजा तालुका-
इसवली-01
चिपळूण तालुका-
चिपळूण शहर-1
कापसाळ-2
ओवळी-1
दापोली तालुका
आडे-2
विसापूर-2
हर्णे-1
फुरुस-6
खेड तालुका
भरणे-2
घरडा लवेल-1
सध्या रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 111 आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे.
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 554
बरे झालेले – 420
मृत्यू – 24
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 110 + 1
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या 48 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 01, संगमेश्वर तालुक्यात 1, दापोली मध्ये 5 गावांमध्ये, खेड मध्ये 8 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 6 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 34, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 2, उपजिल्हा रुग्णालय कळबणी – 1, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – 17 असे एकूण 55 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 22 हजार 123 इतकी आहे.
आत्तापर्यंत 8 हजार पेक्षा जास्त अहवाल निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 8 हजार 954 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 8 हजार 773 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 554 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 8 हजार 183 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये अजून 181 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 26 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 55 हजार 130 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 81 हजार 315 आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती 27 जून 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो
00000