रत्नागिरी नगर परिषदेच्या गटाराची लादी तुटुन शिक्षिका गटारात काेसळली
रत्नागिरी नगर परिषदेच्या गटारावरील लाद्यांवरून चालताना यापुढे सावधगिरी बाळगावी लागणार आहे. रत्नागिरी शहरातील गटारांचे काम मध्यंतरी जोरात सुरू होवून गटारे बांधून त्याच्यावर लाद्याही बसवण्यात आल्या. मात्र त्याच्या दर्जाबाबत कोणीही फारसे लक्ष दिले नाही असे आता दिसत आहे. कारण टिळक आळी परिसरात फुले काढण्यासाठी गटाराच्या लाद्यांवर उभी असलेली एक शिक्षिका लादी तुटल्यामुळे गटारात काेसळल्या आणि त्या जखमी झाल्या. यामुळे आपण उभ्या राहिलेल्या गटारावरील लाद्या या मजबुत आहेत या भ्रमात नागरिकांनी राहू नये असे या घडलेल्या घटनेवरून म्हणावे लागेल
www.konkantoday.com