डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत रक्तदान शिबीर, २५० श्री सदस्य बनले रक्तदाते

0
63

अलिबाग( राजेश बाष्टे): : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रायगड जिल्ह्यातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सामाजिक बांधीलकी जपत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडामार्फत काल अलिबागमध्ये रक्तदान शिबीर पार पडले. पहिल्या टप्प्यात २५० रक्ताच्या बॅग जमा करण्यात आल्या आहेत.
अलिबाग शहराजवळील कुरुळ येथील क्षात्नैक्य माळी समाज सभागृहात सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीराला सुरुवात झाली. ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री पुरस्कार सन्मानित
डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय श्री.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली
रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले हाेते. अलिबाग येथील जिल्हा रक्तपेढीची रक्त साठविण्याची क्षमता मर्यादित असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये २५०बॅग रक्त संकलित करण्यात आल्या. तसेच गरजेनुसार
पुढील टप्प्यात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे डाॅ. डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
सध्या जगावर काेराेना संकट आेढवले आहे. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरलेले आहे. अलिबाग जिल्हा सरकारी रक्त पेढीमध्ये माेठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शस्त्रक्रीया करणे आवश्यक असलेल्या रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये काेणत्याही रुग्णाला रक्ताची कमतरता भासू नये. यासाठी रेवदंडा येथील डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पुढे आले आहे. काेराेनाबाबतच्या नियमांचे पालन करताना सामाजिक अंतर राखणे तसेच सॅनीटायझरचा वापर करुन शिस्तबध्दपणे श्रीसदस्यांनी रक्तदान केले.
याआधी प्रतिष्ठानमार्फत कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील विविध शिबिरांमधून ६हजार ९३९ बॅग्ज आणि परदेशातील सिंगापूर येथील शिबिरातून ६० बॅग्ज रक्त संकलित करण्यात आल्या आहेत. या आधी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने विविध समाजपयाेगी कामे केली आहेत. त्यामध्ये वृक्षलागवड-संगाेपन, आपादग्रस्तांना मदत, स्वच्छता अभियान, दाखले वाटप, स्मशानभूमी, दफनभूमीची स्वच्छता, स्मशानभूीचे बांधकाम, जलपुणर्र भरण, श्रवण यंत्र वाटप, आराेग्य शिबीर असे विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
दरम्यान, अलिबाग येथील रायगड जिल्हा रक्तपेढीचे डॉ. दिपक गोसावी, हेमकांत साेनार, सुनिल बंदीछाेडे,पूनम पाटील,मनीषा नवाळे, प्रणिता पाटील,कुणाल साळवी यांच्यासह अन्य सहकाऱ्यांमार्फत रक्त संकलीत करण्यात आले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here