कोकणाचे सुपुत्र सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फोरमची स्थापना

0
135

भारताची अर्थव्यवस्था सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मजबूत करण्याकरिता आता कोकणाचे सुपुत्र व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला आहे.सुरेश प्रभू यांच्या संयोजनात तसेच अन्य सात सदस्यांचा समावेश असलेली को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फोरमची स्थापना करण्यात येणार आहे.या फोरमच्या माध्यमातून पुढाकार घेऊन सहकार चळवळ वाढवण्यात येणार आहे.यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याची दृष्टी व आत्मानिर्भर भारत साकारण्याकरिता मदत होणार आहे.२४/०६/२० रोजी या संदर्भात वरिष्ठ सहकार क्षेत्रातील लोकांशी चर्चा करण्यात आली व या फोरमची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.४ जुलै हा आंतरराष्ट्रीय को-ऑपरेटिव्ह दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी या फोरमची स्थापना करण्यात येणार आहे.या फोरमचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे तसे त्यांना निमंत्रणही पाठवण्यात आले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here