एसटी बसच्या मासिक, त्रैमासिक पासला मुदतवाढ मिळणार

एसटीच्या ज्या प्रवाशांनी मासिक, त्रैमासिक पास काढले असतील परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल अशा प्रवाशांच्या पासची मुदतवाढ देण्यात येणार आहे. ज्यांना या मासिक, त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे.
२२ मार्च २०२० पासून कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य टाळेबंदी लागू करण्यात आली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णतः थांबविण्यात आली होती. २२ मार्चपूर्वी एसटने प्रवास करणार्‍या अनेक प्रवाशांनी मासिक, त्रैमासिक पास काढले होते. परंतु एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही.
अशा प्रवाशांच्या मासिक, त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येणार आहे. ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रक्कमेचा परतावा हवा असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगारप्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक, त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button